Supriya Sule, NCPराज्यातील स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली अनोखी मोहिम हाती घेतलीय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीन स्त्री-भ्रूण हत्येसंदर्भात जनजागृती करण्यासाठी 25 ऑगस्टला पदयात्रा काढण्यात येणार आहे.

सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव असलेलं नायगाव ते पुणे अशी 68 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणाराय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली.

यामध्ये राज्यातील साडेतीन हजार तरुणी सहभागी होणार आहेत. राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील आणि त्यांची कन्या यांच्या हस्ते या पदयात्रेचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार  28 तारखेला होणाऱ्या सांगता कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे पुढील पाच वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.


article comments powered by Disqus